Description
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती २०२६
जलसंपदा विभाग भरती २०२६ या भरती मध्ये तब्बल १४,०००+ रिक्त पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत Notification लवकरच प्रसिद्ध होणार आहे. Jalsampada Vibhag Bharti 2026 यामध्ये गट क (Group C) साठी ८,४४६ पदे आणि गट ड (Group D) साठी ५,६०५ पदे भरली जातील.
जलसंपदा विभाग भरती २०२६ गट ‘क’ (Group C) मधील पदे:
या गटात प्रामुख्याने कार्यालयीन कामकाज आणि तांत्रिक स्वरूपाच्या एकूण ८,४४६ रिक्त पदांचा समावेश होतो. यामध्ये कनिष्ठ लिपिक/टंकलेखक पदासाठी सर्वाधिक २,१३७ जागा असून, टायपिंग पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या १,९६१ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय अनुरेखक (८१७ पदे), वाहन चालक (८८३ पदे), वरिष्ठ लिपिक (६०८ पदे), आणि कालवा निरीक्षक (५७८ पदे) यांसारखी महत्त्वाची पदे भरावयाची आहेत.
जलसंपदा विभाग भरती २०२६ गट ‘ड’ (Group D) मधील पदे:
या गटात प्रामुख्याने देखभाल आणि सहाय्यक स्वरूपाची एकूण ५,६०५ रिक्त पदे आहेत, ज्यांच्यासाठी सामान्यतः १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे असते. यामध्ये शिपाई/चपराशी पदासाठी सर्वाधिक म्हणजेच २,७१६ जागा रिक्त आहेत. त्यासोबतच चौकीदार/पहारेकरी पदासाठी १,१७७ जागा, कालवा चौकीदार पदासाठी ८६८ जागा, कालवा टपाली पदासाठी ३६५ जागा, आणि प्रयोगशाळा परिचर पदासाठी १८३ जागा उपलब्ध आहेत.
पात्रता :
पदांनुसार १० वी, १२ वी उत्तीर्ण, पदवी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान आहे.
मासिक वेतन – रु. १९,९०० ते रु.१,४२,४००
WRD महाराष्ट्र अर्ज शुल्क 2026 (अपेक्षित)
या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने अर्ज भरण्यासोबत अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे अधिसूचनेत उघड केले आहे.
श्रेणी व अर्ज शुल्क
सामान्य – रु. १०००/-
मागासवर्गीय – रु. ९००/-
माजी लष्करी अधिकारी / अपंग व्यक्ती – शून्य
जलसंपदा विभाग भरती २०२६ महाराष्ट्र अधिसूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
या ई-बुकचा मुख्य उद्देश जलसंपदा विभाग भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. अनेक उमेदवार ग्रामीण भागातील असतात आणि त्यांच्याकडे महागडी मार्गदर्शक पुस्तके किंवा कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध नसते. अशा उमेदवारांनाही दर्जेदार माहिती मिळावी आणि ते आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकावेत, या हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या ई-बुकमध्ये भरती प्रक्रियेपासून ते अंतिम निवडीपर्यंतचा प्रत्येक टप्पा सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच केवळ परीक्षा पास होण्यासाठी नव्हे, तर अधिकारी म्हणून भविष्यातील जबाबदाऱ्या आणि करिअरच्या संधी समजून घेण्यासाठी देखील उपयुक्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
तुम्हाला माझे हे ईबूक कसे वाटले, ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या ईबूकला स्टार रेटिंग द्या.
धन्यवाद!
रविंद्र वि. नागांवकर
✍️ लेखक






Reviews