नोकरी सांभाळून व्यवसाय करण्याची तुमची इच्छा आहे का?
आज अनेक लोकांना नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा आहे; मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा, किती भांडवल लागेल, ग्राहक कसे मिळवावेत आणि व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठून करावी, याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ही गरज लक्षात घेऊन “नोकरी सांभाळून करता येणारे 75 व्यवसाय” हे ई-बुक लिहिले आहे. नोकरी करत असतानाच आपल्या वेळेनुसार, कौशल्यांनुसार आणि उपलब्ध भांडवलानुसार छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी या ई-बुकमधून विविध व्यवसाय कल्पना मिळाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
फक्त व्यवसायाची कल्पना मिळणे पुरेसे नाही; त्या व्यवसायाचे नियोजन करून तो प्रत्यक्षात सुरू करणे आणि सातत्याने वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच “व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा” हे दुसरे ई-बुक लिहिले आहे. व्यवसाय निवड, बाजारपेठेचा अभ्यास, गुंतवणूक, उत्पादन, किंमत ठरवणे, ग्राहक मिळवणे, मार्केटिंग, विक्री, नफा, व्यवस्थापन आणि व्यवसाय विस्तार अशा महत्त्वाच्या विषयांवर व्यावहारिक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न या ई-बुकमध्ये केला आहे.
माझा उद्देश केवळ माहिती देणे नसून नोकरी करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी, तरुण आणि नवउद्योजकांना स्वतःच्या अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरणा आणि दिशा देणे हा आहे. योग्य नियोजन, मेहनत, सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या मदतीने छोट्या सुरुवातीचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होऊ शकते, हा विश्वास या दोन्ही ई-बुक्समागे आहे.
माझे हे ईबूक्स तुम्हाला व्यवसाय निवडण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी उत्तम मार्गदर्शक ठरतील, याची मला खात्री आहे.
धन्यवाद !
रविंद्र वि. नागांवकर
✍ लेखक












Reviews
There are no reviews yet.