Showing the single result
-
₹250.00Original price was: ₹250.00.₹99.00Current price is: ₹99.00.Sold By: oodlay.com“IPS OFFICER कसे व्हावे” हे ईबुक लिहिण्याची प्रेरणा मला अनेक प्रत्यक्ष अनुभवांमधून, अनेक विद्यार्थ्यांच्या संभ्रमातून आणि माझ्या स्वतःच्या विचारांमधून मिळाली. भारतात लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून UPSC ची तयारी करतात. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा चुकीच्या अभ्यास पद्धतीमुळे अनेकांची स्वप्ने अपूर्ण राहतात. काही विद्यार्थी घरात, समाजात किंवा आर्थिक परिस्थितीतून पाय रोखून बसलेले अडथळे तोडू शकत नाहीत. काहींना कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही, काहींना कोचिंग जॉइन केल्यानंतरही दिशा स्पष्ट नसते, तर काही माणसं हुरूप कमी झाल्यामुळे मध्येच थांबून जातात.
मी या ईबुकद्वारे अशीच गोंधळलेली वाट सरळ, स्पष्ट आणि सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.
IPS अधिकारी होणे म्हणजे फक्त नोकरी करणे नव्हे, तर परिवर्तनाची शपथ घेणे आहे. हे ध्येय फक्त पुस्तकांतल्या माहितीमुळे साध्य होत नाही; त्यासाठी योग्य मानसिकता, सातत्य, सामाजिक समज, आत्मविश्वास आणि कर्तव्यभावना आवश्यक असते. हे सर्व एकाच ठिकाणी, एकाच मार्गदर्शकात मिळणे कठीण असते. त्यामुळेच मी हे ईबुक एका संपूर्ण संगतवार मार्गदर्शकाच्या स्वरूपात तयार केले आहे.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या हातात माहिती अमर्याद आहे, पण योग्य माहिती कमी आहे. बर्याच YouTube चॅनेल्स, कोचिंग संस्थांनी आणि सोशल मीडियाने UPSC ला एक अनावश्यक भीतीचं स्वरूप दिलं आहे. जणू काही UPSC फक्त टॉपर्स किंवा जीनियस लोकांसाठी आहे, असा आभास निर्माण केला जातो. पण सत्य हे आहे, UPSC ही मनाची आणि सातत्याची परीक्षा आहे, मेंदूची नव्हे.
या पुस्तकात मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही कुठल्या गावात जन्माला आला आहात, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, यापेक्षा तुमची मेहनत आणि सातत्य महत्त्वाचे आहे. ज्याचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आहे, लोकांसाठी काम करण्याचं आहे, न्याय टिकवून ठेवण्याचं आहे, समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं आहे, त्यांच्यासाठी IPS ही केवळ नोकरी नसून जीवनध्येय आहे.
या पुस्तकात मी UPSC च्या तयारीतील प्रत्येक पायर्या सोप्या भाषेत, क्रमबद्ध पद्धतीने आणि वास्तव उदाहरणांसह समजावल्या आहेत. अनेक विद्यार्थी कुठून सुरुवात करावी?, कोणती पुस्तके वाचावी?, किती तास अभ्यास करावा?, Current Affairs कसा हाताळावा?, Answer Writing कशी करावी? या प्रश्नांमध्ये अडकतात. त्यांना आधार देण्यासाठी हा ग्रंथ तयार केला आहे.
शिवाय, मी या पुस्तकात केवळ अभ्यास नाही, तर मानसिकता, वेळ व्यवस्थापन, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्व आणि नैतिकता या सर्व घटकांवरही चर्चा केली आहे. कारण IPS अधिकारी होणं म्हणजे फक्त परीक्षा पास करणे नव्हे, तर स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.
मी पाहिलेले अनेक विद्यार्थी फक्त चुकीच्या मार्गदर्शनामुळे पराभूत होतात. ते स्वप्न सोडतात. ते जीवनाच्या रणांगणात मागे हटतात. मध्येच लढा सोडून देतात. परंतु मी इथे मनापासून सांगतो, कोणत्याही विद्यार्थाने आपली स्वप्न सोडता कामा नये.
ज्यांच्यात जिद्द आहे, प्रामाणिकता आहे, देशासाठी काहीतरी करण्याची भावना आहे, त्यांना योग्य दिशा आणि योग्य शब्द देणे हे माझे कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी हे ईबुक लिहिले.
या पुस्तकाचा उद्देश:
- प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य, स्पष्ट आणि सत्य मार्गदर्शन देणे.
- UPSC बद्दलच्या चुकीच्या समजुती दूर करणे.
- प्रत्येक वाचकाच्या मनात मी करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणे.
- स्वप्नातून ध्येय बनवणे आणि ध्येयातून यश मिळवणे.
जर या पुस्तकामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात एक ठिणगी पेटली, एक पाऊल पुढे टाकण्याची भावना जागली, एक नवी सुरुवात झाली, तर माझं हे लेखन अर्थपूर्ण ठरेल.
ध्येय फक्त एकच: “प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील IPS Officer स्वप्न पेटते ठेवणे.”
माझे हे इबूक तुम्हाला कसे वाटले ते कृपया मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या इबूक्सला स्टार रेटिंग द्या.
धन्यवाद !
रविंद्र वि. नागांवकर
✍ लेखक

