Sale!

व्हॉट्सअप मार्केटिंग (Whatsapp Marketing)

Original price was: ₹100.00.Current price is: ₹49.00.

व्हॉटसअप मार्केटिंगची गरज व महत्व

व्हॉटसअप बिझनेस अॅप कसे स्थापित करावे ?

व्हॉटसअप बिझनेस टूल्स

बिझनेस प्रोफाइल कसे तयार करावे

कॅटलॉग कसे तयार करावे

अवे मेसेज कसे तयार करावे

ग्रिटींग मेसेज कसे तयार करावे

क्विक रिप्लाय  कसे तयार करावे

लेबल्स कसे तयार करावे

शॉर्ट लिंक कशी तयार करावी

ब्रॉडर्कास्ट लिस्ट कशी तयार करावी

व्हॉटसअप सॉफ्टवेअर्स

Category:

Description

व्यवसाय जगतात मी आपले हार्दिक स्वागत करतो. केवळ व्यवसाय सुरू करून चालणार नाही, तर त्याला जाहिरातीची देखील जोड हवी. तेव्हाच व्यवसाय वाढतो. सोशल मिडियावर जर आपण जाहिरात करत असाल तर व्हॉटसअप मार्केटिंग हा एक उत्तम पर्याय आहे. या अॅपमध्ये बिझनेस टूल्स दिले आहेत जे आपल्या व्यवसाय वाढीसाठी महत्वाचे आहेत. या अॅपमध्ये आपण आपल्या व्यवसायाचा प्रोफाइल तयार करू शकता. आपल्या ज्या वस्तु व सेवा आहेत, त्यांचे मूल्य व माहिती  कॅटलॉगमध्ये प्रविष्ट करू शकता. ग्राहकांच्या चौकशी मेसेजला तुम्ही ताबडतोब अवेमेसेज पाठवू शकता. ग्राहकांनी आपल्या  वस्तु व सेवा यांचा लाभ घेतला असेल, तर त्यांना ग्रिटींग मेसेज पाठविण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे. आपण फार व्यस्त आहात व ग्राहकांचा फोन उचलू शकत नाही, तर त्यांना क्विक मेसेज पाठवू शकता ज्यामुळे ते तुमच्या फोनची वाट पाहू शकतात.

आपल्याकडे बरेच ग्राहक आहेत. कोणता नवीन ग्राहक आहे, कोणता जूना  आहे, कोणत्या ग्राहकाने पैसे दिले आहेत, कोणत्या ग्राहकाकडे पैसे शिल्लक आहेत, कोणत्या ग्राहकांची ऑर्डर पूर्ण झाली आहे, कोणत्या ग्राहकांच्या ऑर्डर्स  पाठवायच्या आहेत, हे लक्षात रहावे म्हणून लेबलची सुविधा उपलब्ध आहे.  आपल्या व्यवसायाचे शॉर्ट लिंक तयार करून ती वेगवेगळ्या सोशल मिडियावर  पाठवू शकता. सगळ्यात महत्वाचे म्हणजेआपण ब्रॉडर्कास्ट लिस्ट तयार करू शकता. एका  लिस्टमध्ये२५६ ग्राहकांना समाविष्ट करू शकता, ही फार मोठी सुविधा या अॅपमध्ये आहे.

व्यवसायसाठी पूरक अशा सर्व गोष्टी या अॅपमध्ये दिल्या आहेत. याची  माहिती  जास्तीत जास्त व्यावसायिकांना व्हावी म्हणनू व्हॉट्सअॅप मार्केटिंग हे ईबूक मी लिहिले आहे. या ईबूकचा तुमच्या व्यवसायाला फार मोठा फायदा होईल, याची मला खात्री आहे.

ईबूक वाचल्यानंतर कृपया आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्हॉट्सअप मार्केटिंग (Whatsapp Marketing)”

Your email address will not be published. Required fields are marked *