-
oodlay posted in the group मी उद्योजक
ऑइल मिलचा व्यवसाय कसा सुरू करावा ?
खाद्यतेल म्हणजेच Edible oil चा प्रत्येक खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्या मूलभूत गरजांप्रमाणेच तेल ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. स्वयंपाकघरापासून ते छोट्या मोठया हॉटेल्समध्ये खाद्य तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविण्याची प्रथा असल्यामुळे खाद्यतेलाला फार मोठी मागणी आहे. त्याशिवाय काही तेलांचा आपल्या आरोग्यासाठी तसेच मसाज करण्यासाठी वापर केला जातो. तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे, आपल्या देशात ऑइल मिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या ठिकाणी भुईमुंगाचे उत्पादन अधिक आहे अशा ठिकाणी तेलाच्या गिरण्या पाहायला मिळतील.
तेल व्यवसाय ही आपल्या देशातील एक अतिशय यशस्वी व्यवसाय कल्पना आहे, म्हणून आपण इच्छित असल्यास, तर तेल विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. ऑइल मिल हा एक उत्तम व अखंड चालणारा व्यवसाय आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची सखोल माहिती किंवा प्रशिक्षण घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन मिळते.
खाद्यतेलाचे प्रकार खालील प्रमाणे :-
मोहरीचे तेल, ऑलिव्ह तेल, पाम तेल, सोयाबीन तेल, कॅनोला तेल, कॉर्न तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, तिळाचे तेल, तांदूळ तेल इ. याशिवाय इतर अनेक वनस्पती तेलांचा वापर स्वयंपाकात केला जातो. त्यामुळे आपल्याला कोणत्या ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे, ते ठरवा आणि त्याप्रमाणे पाऊले उचला.
ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी :–
ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, त्या नंतर तुम्ही यशस्वीरीत्या हा व्यवसाय सुरू करू शकता.
भांडवल :-
ऑइल मिलचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे रु.५०,००० ते रु.२.५ लाख एवढे भांडवल अत्यावश्यक आहे.
परवाना आणि नोंदणी :-
छोट्या प्रमाणावर ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते परवाने व नोंदणी यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. याकरीता तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून उद्योग आधार परवाना आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा व्यवसाय खाद्यपदार्थांशी संबंधित असल्यामुळे fssai चा परवाना आणि नोंदणी देखील आवश्यक आहे.
ऑइल मिलसाठी लागणारी जागा :-
२०० ते ३०० स्के. फू. जागेमध्ये आपण छोटा ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करू शकता.
कच्चा माल :-
मोहरी, तीळ, शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल बियाणे, रेपसीड यांसारख्या कच्च्या मालापासून तेलाचे उत्पादन मिळवू शकता.
मशिनरी :-
ऑइल मिलसाथी प्रामुख्याने खालील दोन प्रकारच्या मशिन्सची आवश्यकता आहे.
खाद्यतेल एक्सपेलर :-
या यंत्रामध्ये कच्च्या बियांमधून तेलाचे उत्पादन काढले जाते. यामध्ये तेल आणि बियांचा लगदा वेगळा होतो. पशुंसाठी खाद्य म्हणून देखील हा लगदा विकता येतो, त्यातून उत्पन्न मिळते.तेल फिल्टर मशीन :-
या मशीनच्या मदतीने तेल फिल्टर करून पॅकेजिंगसाठी तयार केले जाते. इलेक्ट्रिक आणि डिझेल अशा दोन प्रकारच्या मशीन्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वजन करण्यासाठी वजनयंत्र, याची किंमत रु.५,०००/- ते १०,०००/- व प्लास्टिक पिशवी
पॅकिंगकरीता सीलिंग मशीन, याची किंमत रु.२०००/- आहे. किंवा तेल भरण्यासाठी आपण प्लास्टिकच्या बाटल्यांचा देखील वापर करू शकता.
विपणन :-
सुरुवातीला व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रथम स्वत: तेल वापरून पहा. ते जर वापरण्यास योग्य असेल तर तुमच्या जवळच्या शेजारी, मित्रमंडळी व नातेवाईक यांना नमुने द्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. जर त्यांच्या प्रतिक्रिया योग्य नसतील तर तुमच्या उत्पादनामध्ये काहीतरी चूक आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे अधिक माहिती घ्या व उत्पादनामध्ये बदल करा. त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया उत्तम असतील तर त्याप्रमाणे उत्पादन करण्यास सुरुवात करा. आज बाजारामध्ये तेलाची प्रचंड मागणी आहे, त्यामुळे सुरुवातीला तुमच्या विभागात व्यवसाय करण्यास सुरुवात करा आणि मग हळू हळू व्यवसाय वाढवा. तेलाचा व्यवसाय हा अधिक फायदेशीर आहे. या व्यवसायात १५% ते २०% एवढा नफा मिळवता येतो.ऑइल मिल मशीनचे उत्पादक :–
१. सुनील इंडस्ट्रीज
संपर्क व्यक्ती : प्रशांत सुतार
पत्ता : 1325/69, शिवाजी उद्यम नगर, कोटीर्थ जवळ, कोल्हापूर – ४१६००८, महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी क्र. : +९१ ९३७११२६४६४ / ९३७१२२६४६४ / ९३७३०८२३७६ /
८८८८४ ४४१०२
ईमेल: response@oilmillmachinesindia.com
वेबसाइट: http://www.oilmillmachinesindia.com२. मॅक्लॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज प्रा. लि.
श्री सहदेव करंजीकर (संचालक)
गेट क्रमांक १५२९, सोनवणे वस्ती चिखली, महालक्ष्मी वजन पुला लेन,
पुणे – ४१११०६२,
दूरध्वनी क्र. : ०८०३७४००१५९
वेबसाइट – http://www.maxlordind.com३. एस एम बी इंजिनिअर्स प्रा. लि.
पत्ता : क्रमांक-४०१, तिसरा मजला, ग्रीन पार्क, चर्च रोड, मरोळ, अंधेरी (पू), मुंबई – ४००५९
दूरध्वनी क्र. : ०२२ – २९२५६७८६ / २९२५७८५२ / २९२५४५५२४. कामधेनू अॅग्रो मशिनरी
संपर्क व्यक्ति : महेश हटवार
पत्ता : पॉवर हाऊस, प्लॉट क्र. 6 जवळ, वठोडा रोड, हिवरी नगर, नागपूर, महाराष्ट्र
संपर्क : +९१ ९३७१५७४३०३ / ७८८७८६४३०३ / ९४२२११२२१६
ईमेल : kamdhenuagromachineries@gmail.com
वेबसाइट : kamdhenuagromachineries.com५. एस डी ट्रेडर्स
संपर्क व्यक्ती: दत्ता देवकाते (भागीदार)
पत्ता : १/८, रिव्हर रोड, सारस्तो सायकल मार्ट जवळ, पिंपरी, पुणे-411018, महाराष्ट्र, भारत
संपर्क : +९१ ८२०८६४०४१६ / ७७२२०८०७०७
ईमेल : sdtraders07@gmail.com
Groups
मी उद्योजक
Public Group
सरकारी नोकरी
Public Group
Recent posts

घरच्याघरी पुरणपोळीचा व्यवसाय कसा सुरू करावा?
- September 17, 2026

How To Start Best Profitable Namkeen Business?
- August 15, 2026

भिजवलेल्या कडधान्यांचा व्यवसाय कसा सुरू करावा?
- August 15, 2026
ADDRESS
Mumbai, Maharashtra, India
Website
Phone Number
+91 9867930853
